जीव गुंतला...
निदान आपल्यावर अवलंबून असलेल्यांसाठी तरी आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे. आजच्या दिवशी २ वर्षांपूर्वी माझा एक छोटासा अपघात काय झाला, आणि या चिमुकल्या जीवांचं विश्व काही दिवसांतच होत्याचं नव्हतं झालं. यांच्या पोटाचं हाल झालं, यांची निगा राखायला आणि निगराणी करायलाही कुणी नव्हतं. यातलं एक कुठंतरी गाडीच्या चाकाखाली घावलं, एकानं भुकेनं व्याकूळ अवस्थेत काहीतरी बाधक खाल्लं आणि त्यातच तडफडून गेलं, तर एकाला बोक्यानं पळवलं बहुतेक असं मला कळलं. अजूनही कधी कधी मी माझ्या त्या जुन्या घरी गेलो की, सर्वात आधी यांचीच म्याँव म्याँव आठवते, त्यांच्या शी सूचा उग्र दर्प आठवणीत दरवळतो, या त्रिकुटाची एका कोपऱ्यात पडलेली नाश्ता आणि जेवणाची प्लेट पाहिली की हुंदका दाटून, डोळे टचकन भरून येतात.!🎭 #आयुष्य_वगैरे #अडगळ 💔 #गंध_आठवणींचा