पप्पा
माझ्या आईला आणखी दोन बहिणी, आणि या तिघींत एक भाऊ, म्हणजे माझा मामा. मी जसजशी मोठी होत गेली, तसतसं मला कळत गेलं की, हे माझ्या मामाचं घर आहे. म्हणजे मी माझ्या आईच्या माहेरी आहे. मला एक मोठी बहीण. तिचं नाव आदिती. ती ब-यापैकी चांगल शिकलीये आणि काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालंय. सरकारी नोकरीवाला नवरा मिळालाय तिला. तिच्या संसार वेलीवर आता एक गोंडस फुलंही आलंय आता. सगळं काही मस्त मजेत सुरू आहे. कधी कधी आजूबाजूला पाहिलं की मला एकच प्रश्न पडायचा की, माझे वडील कुठे आहेत.? आणि माझ्या दोन्ही मावश्या ही, माझ्या आईप्रमाणे इकडे माहेरीच का असतात.? मी हळूहळू मोठी होत जात होते, तशी तशी कळत नकळत मला माझ्या प्रश्नांची उत्तरे भेटत जात होती. मोठ्या मावशीचा नवरा लग्नानंतर काही वर्षांतच वारला होता, अणि तिला मुलंबाळं असं काही झालंच नव्हतं. मधली मावशी कित्येक वर्षांपूर्वी सासरी भांडून आल्यापासून परत नांदायला गेलीच नाही. मध्यंतरी तिचे सासू सासरे वारले, नवरा ही जिवघेण्या अपघातात सापडून ही बचावला, तरीही इकडील कुणीच तिकडं गेलं नाही, वा साधी विचारपूस ही केली नाही. सर्वात लहान बहीण म्हणजे माझी आई ही, पप्पांशी पटत ना...