पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ही तुझी आठवण

                    या सुट्टीच्या दिवसातील एकेक क्षणही ना कित्ती अंगावर येतो. मग मोकळ्या अंगणाकडे पाहत घराच्या उंबरठ्यावर मी तासनतास बसून राहतो. तिथं तुझ्या हातची, अगदी तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर साधी, शिंपल रांगोळी शोधतो. किचनमध्ये भांडी वाजल्याचा भास झाला की, पुन्हा किचनमध्ये जाऊन बसतो. सगळं किचन कसं सामसूम असतं. सगळी भांडी 'हाताची घडी तोंडावर बोट' या अवस्थेत माझ्याकडे पाहत कुजबुजत असतात. घराच्या अगदी मागच्या छोट्याशा खिडकीतून येणारी हवेची झुळूक, प्रत्येक चौकटीला अडकवलेले, तू स्वतः शिवलेले मऊ तलम पडदे, हे ना, मी आतबाहेर करत असताना सतत मला बिलगत असतात. मला तू बिलगायचीस ना, अगदी तसंच. तसं सगळं घरच तुला आवडायचं, पण तुझ्या विशेष आवडीच्या जागी, मग मी जाऊन बसतो. तुझ्या आवडीच्या मालिका, गाणी पुन्हा पुन्हा पाहतो ऐकतो. नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी नळाला पाणी यायच्या आधी नळ खोलून ठेवतो. जेमतेम काल भरलेलं सगळं पाणी ओतून, नवीन पाणी भरतो. त्यात तुरटी फिरवतो. सगळं पाणी भरून झालं की, पाणी बंद होण्याआधी नळाखाली पाय ठेवून बसून पाण्यात खेळत राहतो, तू...

अथांग

मध्यंतरी ना, बरेच दिवस नाव भरकटली होती. पण का कुणास ठाऊक ते भरकटणं तात्पुरतं का असेना, जीवाला समाधान देऊन जात होतं. भरकटणं चांगलं होतं की वाईट, त्यात काही नवीन होतं का, या सगळ्या गोष्टी ना तेव्हा मला फार गौण वाटल्या. कारण काही दिवस का असेना, तो प्रवास, ते हरवलेपण, नजरेला दिसणारा तो अथांगपणा हवाहवासा वाटत होता. पण विसरणं म्हणजे कायमचं विसरलं असं होतं नाही ना. कधी ना कधीतरी ते सगळं पुन्हा एकदा आठवणं आलंच.!🎭 #अडगळ #आयुष्य_वगैरे