अथांग
मध्यंतरी ना, बरेच दिवस नाव भरकटली होती. पण का कुणास ठाऊक ते भरकटणं तात्पुरतं का असेना, जीवाला समाधान देऊन जात होतं. भरकटणं चांगलं होतं की वाईट, त्यात काही नवीन होतं का, या सगळ्या गोष्टी ना तेव्हा मला फार गौण वाटल्या. कारण काही दिवस का असेना, तो प्रवास, ते हरवलेपण, नजरेला दिसणारा तो अथांगपणा हवाहवासा वाटत होता. पण विसरणं म्हणजे कायमचं विसरलं असं होतं नाही ना. कधी ना कधीतरी ते सगळं पुन्हा एकदा आठवणं आलंच.!🎭
#अडगळ #आयुष्य_वगैरे