पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विहीर

दुपारचं जेवण आटोपलं, तेव्हापासूनच शाम्या विहीरीवर बसून होता. निवडक भांडी धुवून आईनं स्वयंपाकघरातच पाठ टेकली होती, तर बाप अगदी मुख्य चौकटीवरच डोकं ठेवून निवांत झोपी गेला होता. दुपारची वेळ असूनही आता हवेत गारठा भरपूर प्रमाणात जाणवत होता. थंडी हळूहळू जोर धरू लागली होती. केंद्र हरवलेला रेडिओ कधीपासून खरखरत सुरू होता, पण तो आवाजही सवयीचा असल्याने तो बंद करायला माझा हात तिकडं जातच नव्हता. बाहेर खुंटीला टांगलेली लांबलचक पाईपांची जुनाट घंटी हवेच्या झोक्यावर अलगद डुलत होती. कोणत्याही जनावरांशिवाय असणारा जुना गोठा अजूनही जनावरांच्या शेणामुताच्या आठवणी जपत उभा होता. शाम्याचा एक मोठा भाऊ बायका पोरांसहीत शहरात राहतो. अधेमध्ये इकडं येऊन जातो. तसा शाम्या दररोजच विहीरीवर जाऊन बसतो. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी मध्यरात्री ही.! शाम्याच्या आईला फार कमी दिसतं, आणि बापाला ब-यापैकी काही ऐकूच येत नाही. म्हणून मग शाम्या मनातलं काही बोलायचं असलं की विहीरीवर जाऊन बसतो आणि एकटाच बडबडतो. आज हे केलो, आज ते गेलो, उद्या ते करणार वगैरे वगैरे. शाम्या तसा चांगला माणूस. आता समाजाच्या दृष्टीने चांगला माणूस म्हणजे कोण अस...

दिसतं तसं नसतं..

जेवणाची सुट्टी झाली होती. कडकडून भूक लागली असल्याने मी लागलीच माझा मेसचा डबा घेऊन खुर्ची सोडली. बाहेर व्हरांड्यात कधीपासून गोंधळ सुरू होता, पण न्यायालयात तर हे नेहमीचच, असं स्वतःशीच पुटपुटत मी दुर्लक्ष करून तसाच पुढे निघून आलो. आता २०-२५ मिनिटे उलटली होती. मी जेवण करून माझ्या कार्यालयात परतत होतो, तरीही अजूनही व्हरांड्यातील तो गोंधळ सुरूच होता. आता मात्र न रहावल्याने मी क्षणभर तिथंच थांबून नेमका विषय काय आहे, ते पाहू लागलो. लाकडी बाकड्यावर जवळपास ३५-४० मधील वयाचा एक व्यक्ती ओक्साबोक्शी रडत होता. ब-यापैकी नीटनेटका आणि सुशिक्षित दिसत होता. पांढरीफटक दाढी आणि केसही जवळपास तसेच. पाठीला एक बॅकपॅक दिसत होती. त्याच्या बाजूला बहुतेक त्याच्याच वयाचे २-३ व्यक्ती त्याला सावरत धीर देत होते. आपण शेवटपर्यंत चांगल्या भावनेने लढलो, पण दिसतं तसं नसतं मित्रा, आणि हे जग शेवटी दिसण्यालाच भुलतं वगैरे वगैरे. तितक्यात त्यांचे वकील तिथं आले, आणि तो आणखीन जास्तच रडू लागला.... "साहेब, जो चांगल्यासाठी भांडतो, त्याचं चांगलंच होईल, असं नसतं हो. डोळ्यांवर पट्टी असो वा नसो, ही न्यायदेवता आंधळी आहे, आणि नेहमी आं...