पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मरेपर्यंत फाशी...

"ढाई किलो का हात" या आंतरराष्ट्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मा. सनी (भाऊ) देओल यांनी त्यांच्या एका गद्यपद्यकाव्यमिश्रित अनुभवात कित्ती छान शब्दांत आपल्या न्यायव्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. "तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला माई लॉर्ड, इंसाफ नहीं मिला. मिली हैं ,तो सिर्फ ये तारीख.! न्यायालयात आपण न्याय मागण्यासाठी गेल्यावर, जवळपास सगळ्या गोष्टी ब-यापैकी ठीकठाक कळूनही, उगाचच आपल्याला खेळवत ठेवलं जातं. आपला संयम तिथं तपासला जात असावा बहुतेक. पण जसजसा वेळ पुढे निघून जात असतो ना, तेव्हा हळूहळू आपल्या लक्षात येत जातं की, आपण जो न्याय आपल्या पदरात पडण्याची वाट पाहत बसलोय ना, तो पदरात पडण्याची वाट पाहणं, हीच आपल्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे.! कोर्टात फक्त तारखा खेळत बसणं म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा, मात्र फासावर लटकवून ही जीव न जाण्यासारखं आहे. फास तर गळ्यात पडलेलाच आहे, आता फक्त जीवघेणी प्रतिक्षा करत रहायचं.!🎭  #आयुष्य_वगैरे  #अडगळ  (सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)

आठवणींची खळखळ..

आईला अगदी तिच्या बालपणापासूनच ओढ्याच्या वाहत्या पाण्यात धुणं धुवायची सवय आहे, त्यामुळे ती नेहमीच कपडे दणादण आपटून आपटून धुते, आणि त्यावेळी अगदी बारीक आवाजात सss सss अशा आवाजाचं कोरसं ही देत असते. ती नेहमीच म्हणत असते की, वाहत्या पाण्यात कपडे धुवायची मजा काही औरच, पण आता ते शक्य होत नाही. कधी कधी सुट्टीच्या दिवशी जेव्हा मी #विरंगुळा म्हणून माझे कपडे धुवून टाकतो ना, तेव्हा ती म्हणते की, राजा.., माझ्यापेक्षा स्वच्छ कपडे धुतले रे तू.! तेव्हा मी म्हणतो की, आई.. सगळं काही तुझ्याकडूनच तर शिकलो आहे. हां.. पण ते आपटून आपटून कपडे धुणं मात्र काही केल्या जमत नाही हं.! माझ्या या वाक्यानंतर मग किरकोळ हशा वगैरे आणि मग पुन्हा एकदा आई कपडे धुण्यात मग्न..!🎭 #आयुष्य_वगैरे  #प्रेम_आई ❤️

सुकलेल्या गुलाबाच्या आठवणी...

ती :- मला तुला आनंदी पहायला आवडतं नाही असं नाही, पण आज तू इतका आनंदी का आहेस रे.? तो :- अगं..‌फक्त स्वप्नरंजन गं, बाकी काही नाही.  ती :- स्वप्नरंजन..? असं कोणतं स्वप्नं आहे जे तुला इतका आनंद देऊन जातं, मलाही जाणून घ्यायचं आहे रे.! प्लीज.. सांगशील काय.!? If u don't mind.. तो :- अगं वेडाबाई.., त्यात काय एवढं. आणि तुझ्याशी संबंधित गोष्टी तुलाच सांगायला मला कसली अडचण वगैरे. ती :- माझ्याबद्दल म्हणजे.? नेमकं काय म्हणायचं आहे तुला.? तो :- अगं हो हो... Chill.. don't panic dear.. ती :- ए.. आता चुपचाप पटकन सांगतोस की नाही. नाही तर ही निघाले बघ मी. तो :- अगं ऐक, अशी रागावू नकोस. अगं... थांब ना.. अगं., कधी कधी मी सहज कल्पना करतो आहे की, कधीतरी, कुठेतरी माझ्या अधु-या स्वप्नांच्या, त्या सुकलेल्या गुलाबाच्या आठवणी सोबत घेऊन, मी तुला एकांतात भेटेन. आणि तेव्हा खूप वर्षांपूर्वी, त्यादिवशी तुझ्याशी बोलायचं राहिलेलं सगळं काही बोलेन. नुसता असा विचार जरी केला तरी कित्ती आनंदून जात माझं मन.! हेच कारण आहे माझ्या इतक्या अमाप आनंदाचं.! वेडपट असं वाटेल तुला कदाचित, पण असाच आहे मी. वेडपट विचार करणारा आणि ...