सुकलेल्या गुलाबाच्या आठवणी...

ती :- मला तुला आनंदी पहायला आवडतं नाही असं नाही, पण आज तू इतका आनंदी का आहेस रे.?

तो :- अगं..‌फक्त स्वप्नरंजन गं, बाकी काही नाही. 

ती :- स्वप्नरंजन..? असं कोणतं स्वप्नं आहे जे तुला इतका आनंद देऊन जातं, मलाही जाणून घ्यायचं आहे रे.! प्लीज.. सांगशील काय.!? If u don't mind..

तो :- अगं वेडाबाई.., त्यात काय एवढं. आणि तुझ्याशी संबंधित गोष्टी तुलाच सांगायला मला कसली अडचण वगैरे.

ती :- माझ्याबद्दल म्हणजे.? नेमकं काय म्हणायचं आहे तुला.?

तो :- अगं हो हो... Chill.. don't panic dear..

ती :- ए.. आता चुपचाप पटकन सांगतोस की नाही. नाही तर ही निघाले बघ मी.

तो :- अगं ऐक, अशी रागावू नकोस. अगं... थांब ना..

अगं., कधी कधी मी सहज कल्पना करतो आहे की, कधीतरी, कुठेतरी माझ्या अधु-या स्वप्नांच्या, त्या सुकलेल्या गुलाबाच्या आठवणी सोबत घेऊन, मी तुला एकांतात भेटेन. आणि तेव्हा खूप वर्षांपूर्वी, त्यादिवशी तुझ्याशी बोलायचं राहिलेलं सगळं काही बोलेन. नुसता असा विचार जरी केला तरी कित्ती आनंदून जात माझं मन.! हेच कारण आहे माझ्या इतक्या अमाप आनंदाचं.! वेडपट असं वाटेल तुला कदाचित, पण असाच आहे मी. वेडपट विचार करणारा आणि बहुतेक कधीही पुर्ण न होऊ शकणा-या स्वप्नांमागे धावणारा...!🎭

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..