आठवणींची खळखळ..
आईला अगदी तिच्या बालपणापासूनच ओढ्याच्या वाहत्या पाण्यात धुणं धुवायची सवय आहे, त्यामुळे ती नेहमीच कपडे दणादण आपटून आपटून धुते, आणि त्यावेळी अगदी बारीक आवाजात सss सss अशा आवाजाचं कोरसं ही देत असते. ती नेहमीच म्हणत असते की, वाहत्या पाण्यात कपडे धुवायची मजा काही औरच, पण आता ते शक्य होत नाही. कधी कधी सुट्टीच्या दिवशी जेव्हा मी #विरंगुळा म्हणून माझे कपडे धुवून टाकतो ना, तेव्हा ती म्हणते की, राजा.., माझ्यापेक्षा स्वच्छ कपडे धुतले रे तू.! तेव्हा मी म्हणतो की, आई.. सगळं काही तुझ्याकडूनच तर शिकलो आहे. हां.. पण ते आपटून आपटून कपडे धुणं मात्र काही केल्या जमत नाही हं.! माझ्या या वाक्यानंतर मग किरकोळ हशा वगैरे आणि मग पुन्हा एकदा आई कपडे धुण्यात मग्न..!🎭
#आयुष्य_वगैरे
#प्रेम_आई ❤️