मरेपर्यंत फाशी...

"ढाई किलो का हात" या आंतरराष्ट्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मा. सनी (भाऊ) देओल यांनी त्यांच्या एका गद्यपद्यकाव्यमिश्रित अनुभवात कित्ती छान शब्दांत आपल्या न्यायव्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. "तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला माई लॉर्ड, इंसाफ नहीं मिला. मिली हैं ,तो सिर्फ ये तारीख.! न्यायालयात आपण न्याय मागण्यासाठी गेल्यावर, जवळपास सगळ्या गोष्टी ब-यापैकी ठीकठाक कळूनही, उगाचच आपल्याला खेळवत ठेवलं जातं. आपला संयम तिथं तपासला जात असावा बहुतेक. पण जसजसा वेळ पुढे निघून जात असतो ना, तेव्हा हळूहळू आपल्या लक्षात येत जातं की, आपण जो न्याय आपल्या पदरात पडण्याची वाट पाहत बसलोय ना, तो पदरात पडण्याची वाट पाहणं, हीच आपल्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे.! कोर्टात फक्त तारखा खेळत बसणं म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा, मात्र फासावर लटकवून ही जीव न जाण्यासारखं आहे. फास तर गळ्यात पडलेलाच आहे, आता फक्त जीवघेणी प्रतिक्षा करत रहायचं.!🎭 

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 

(सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..