पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुन्हा सासरे बुवा..

टाळ, मृदंग आणि तबल्याची जुगलबंदी एकसारखी सुरूच होती.  सोबतीला ढगांचा ढोलही ताल धरू लागला होता. या सर्वांच्या तालावर वीज आणि वारा सुसाट वेगाने बेभान होऊन नाचत होते. पावसाच्या सरीही मोठमोठ्या टपो-या थेंबांच्या साह्याने ताशा वाजवू लागली होती. आणि इकडं आत हळूहळू सगळी मंडळी भजनात दंग होऊन गेली होती. मी अधेमधे समोर एका ओळीत असलेल्या महापुरुषांच्या चित्राकडे पाहत होतो, तर कधी टाळ आणि तबल्याची नाद अनुभवत होतो. आजूबाजूला जमलेल्या मोजक्याच पण भजनात पुर्णपणे तल्लीन झालेल्यांची मुर्ती न्याहाळत होतो. समोर एकूण चार महापुरुषांची चित्रं आहेत. त्यांच्याकडे एकेक करून पाहत असताना तुझ्याशी आणि बालपणाशी निगडित एकेक गोष्टी अगदी सहज आठवून जात होत्या. पंत महाराजांच्या हातातील छडी पाहून तुझ्या आजोबांच्या हातातील आधाराची छडी आठवली. त्यांना लागूनच आणखी एक महाराज एका लाकडी खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांची ती खुर्ची पाहून आपल्या मोहरमच्या लाकडी गाड्याची आठवण आली, जो नेहमीच आपल्या गल्लीत एका दगडी भिंतीला टेकून उभा असायचा. त्यापुढील स्वामी समर्थांच्या फोटो मागील गाय वासरू आणि इतर प्राणी पाहून आपल्या परड्यातील जनावर...

हरवलेली पाखरं..

कधीकाळी दिसेल त्या वाहनाच्या मागे मागे धावणारा, संध्याकाळी कामावरून लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी धडपडणारा, आता नेहमीच निवांत दिसतो. त्याची सकाळ तर तशी नेहमीसारखीच वाटते, पण संध्याकाळ अशी कशी काय बदललेली असेल.? हव्या त्या स्टॉपवर, हव्या त्या वेळी पोहचून ही तो आता ब-यापैकी वाहनांचा पाठलाग न करता निवांत उभा दिसतो. कित्येकदा तर मी त्याला अगदी हाताच्या अंतरावर असणारी वाहनं ही सोडून निवांत थांबलेलं पाहिलंय. तेव्हा मला प्रश्न पडतो की, असा नेमका काय बरं बदल झाला असेल याच्या आयुष्यात.?🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🫂

ताई..

प्रिय बाळं चिनू ताई, तसं हे खूप दिवसांपूर्वी म्हणजे बहुतेक सव्वा एक वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, पण का कुणास ठाऊक, ना तेव्हा तुला पाठवायची हिम्मत झाली, आणि ना आत्ताही होत आहे. अगदी लहानपणापासून तू अंगाखांद्यावर खेळलेली, मला बहीण वगैरे नसल्याने अगदी लहानपणीच तू माझी चिनू ताई झालेली. तुझ्या बालपणात कित्ती कित्ती गोड आणि सुंदर आठवणी दिलेल्या आहेस तू. तसं विशेष काही नाही, पण आपल्या अंतर्मनात नेमकं काय चाललं आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं. आणि बहुतेक याच पर्यावसान आपल्याला पडणाऱ्या स्वप्नात होत असावं. काही महिन्यांपूर्वी मला पडलेल्या एका स्वप्नात तू, मी आणि माझी एक मैत्रीण असे आपण तिघे मस्तपैकी भटकंती करत होतो, पण खरंतर real life मध्ये माझी अशी कोणी मैत्रीण कधीच नव्हती, आणि आजही नाही. तेव्हा मला हे स्वप्न अगदी नॉर्मल वाटलं, म्हणून तुला याबद्दल काहीच बोललो नाही. पण चिनूताई, काही दिवसांपूर्वी तू पुन्हा एकदा माझ्या स्वप्नात तू आली होतीस. यावेळी तू अगदी लहान होतीस. अगदी पांढराशुभ्र ड्रेस, पार्ले जी च्या बिस्कीट पुड्यावर ती छोटीशी मुलगी असते ना, अगदी तिच्यासारखे केस, गोरे गोरे गुबगुबीत गाल फुगवून...