ताई..

प्रिय बाळं चिनू ताई,

तसं हे खूप दिवसांपूर्वी म्हणजे बहुतेक सव्वा एक वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, पण का कुणास ठाऊक, ना तेव्हा तुला पाठवायची हिम्मत झाली, आणि ना आत्ताही होत आहे. अगदी लहानपणापासून तू अंगाखांद्यावर खेळलेली, मला बहीण वगैरे नसल्याने अगदी लहानपणीच तू माझी चिनू ताई झालेली. तुझ्या बालपणात कित्ती कित्ती गोड आणि सुंदर आठवणी दिलेल्या आहेस तू. तसं विशेष काही नाही, पण आपल्या अंतर्मनात नेमकं काय चाललं आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं. आणि बहुतेक याच पर्यावसान आपल्याला पडणाऱ्या स्वप्नात होत असावं. काही महिन्यांपूर्वी मला पडलेल्या एका स्वप्नात तू, मी आणि माझी एक मैत्रीण असे आपण तिघे मस्तपैकी भटकंती करत होतो, पण खरंतर real life मध्ये माझी अशी कोणी मैत्रीण कधीच नव्हती, आणि आजही नाही. तेव्हा मला हे स्वप्न अगदी नॉर्मल वाटलं, म्हणून तुला याबद्दल काहीच बोललो नाही. पण चिनूताई, काही दिवसांपूर्वी तू पुन्हा एकदा माझ्या स्वप्नात तू आली होतीस. यावेळी तू अगदी लहान होतीस. अगदी पांढराशुभ्र ड्रेस, पार्ले जी च्या बिस्कीट पुड्यावर ती छोटीशी मुलगी असते ना, अगदी तिच्यासारखे केस, गोरे गोरे गुबगुबीत गाल फुगवून, हातवारे करून काहीतरी सांगू पाहत होतीस, पण मला काहीच कळत नव्हतं.!🥹

Miss You चिनूताई... Take care 

तिथं पुण्यात आपल्या मिरजेतील बरीच मंडळी आहेत म्हणे, अधेमध्ये सवडीने त्यांना भेटत जा, बरं वाटेल तुला ही.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️🫂

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..