हरवलेली पाखरं..
कधीकाळी दिसेल त्या वाहनाच्या मागे मागे धावणारा, संध्याकाळी कामावरून लवकरात लवकर घरी पोहोचण्यासाठी धडपडणारा, आता नेहमीच निवांत दिसतो. त्याची सकाळ तर तशी नेहमीसारखीच वाटते, पण संध्याकाळ अशी कशी काय बदललेली असेल.? हव्या त्या स्टॉपवर, हव्या त्या वेळी पोहचून ही तो आता ब-यापैकी वाहनांचा पाठलाग न करता निवांत उभा दिसतो. कित्येकदा तर मी त्याला अगदी हाताच्या अंतरावर असणारी वाहनं ही सोडून निवांत थांबलेलं पाहिलंय. तेव्हा मला प्रश्न पडतो की, असा नेमका काय बरं बदल झाला असेल याच्या आयुष्यात.?🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🫂