09/10/2022
वरवर सुंदर दिसणाऱ्या एखाद्या शांत ज्वालामुखी प्रमाणे जगत असतो पुरूष. आपल्या आजूबाजूला असलेली हिरवळ जपावी, म्हणून तो स्वतःला सतत आवर घालत असतो. आतल्या आत धुमसत असतो, जळत असतो. कारण एखादी गोष्ट मग ती चांगली असो वा वाईट, त्याबद्दल अगदी बेधडक आणि रोखठोक बोलण्याचा अधिकार हा पुरुषांना बहुतेक वेळा कधी नसतोच. मग हे सारं काही मनातल्या मनात साठत असतं आणि खदखदत ही असतं. सतत, अविरतपणे सगळं फक्त साठत राहतं. असे कितीतरी चालते फिरते ज्वालामुखी आयुष्यभर फक्त आतून जळत राहतात, पण त्यांची ती खदखद, आत धुमसत असलेली आग, ती धग कधीच बाहेर येत नाही. आणि त्याची झळ आजूबाजूच्या लोकांना कधी जाणवतही नाही. आणि हा so called समाज वगैरे फार पुर्वीपासून सतत म्हणत आलाय की, सगळे भोग हे फक्त आणि फक्त स्त्रीच्याच नशिबी लिहलेले असतात. पण पुरूष काय आणि स्त्री काय. आयुष्यभर जळत तर सगळेच असतात. स्त्रियां रडून, बोलून मोकळ्या होत जातात, पण पुरूषांना तर रडायची आणि बोलायची ही चोरी असते. पुरूषांना ही त्यांच्यां व्यथा जाणून घेणारं, मायेनं गोंजारणारं, आधाराचे चार शब्द सांगणारं असं कुणीतरी हवं असतं. सगळेच पुरूष वासनांध आणि शरीर सुखाला चटावलेले नसतात. त्यांनाही आपलं, आपल्या विश्वासाचं, आपल्या ह्रदयाच्या अगदी जवळचं, असं कुणीतरी हवं असतं.!🎭