ओढ १६/०५/२०२३
दिवसभर घराचं घरपण, घरात डांबून ठेवलेलं असतं. बंद घराचा आतल्या आत गोंधळ सुरू असतो. सकाळचे काही क्षण सोडले, तर नंतर घर त्या कोंडमा-याला वैतागून गेलेलं असतं. संध्याकाळ कधी होणार.? घरात माणसं कधी परतणार.? या विचाराने घर सतत घड्याळाची टिकटिक मोजत असतं. झालं हं... आणखी थोडासा वेळ.., आत्ता एवढ्यात माणसं येतील.., अशी समजूत घालत भिंती घराला आधार देत असतात. आणि घरालाही तहान भूक असतेच हो, ती म्हणजे माणसांची.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ