याला जीवन ऐसे नाव..
मरण यायला वयाचं काही बंधन नसतं. ते कधीही, कुठेही कसंही ते येऊ शकतं. कधी कधी तर असं वाटतं की, एखादी व्यक्ती मरणाच्या अगदी हातात हात घालून फिरते आहे. त्यांच्या बोलण्यात सतत..., अरे.., जो काय आहे तो आजचा दिवस, आत्ताचा क्षणच आहे. उद्या काय होईल कोण पाहिलंय.? आणि असं वागणारी, बोलणारी माणसंच एक दिवस अचानक आपल्यातून निघून जातात. हिरव्यागार झाडाची, हिरवीगार पानं ही कधी कधी अचानक गळून पडतात.!
#आयुष्य_वगैरे