सुखाची बाजू...! २६/११/२०२२

कुणीतरी जवळचं आपल्याला त्याच्या अडीअडचणी, सतत येणार अपयश वगैरे सांगत असतं. आपणही ते सारं काही अगदी मनापासून ऐकत असतो. त्याच्या खांद्यावर हात टाकून, त्याला आधार द्यायचा प्रयत्न करत असतो, त्याला सांगत असतो की, हे ही दिवस जातील, हताश होऊ नकोस. तरीही समोरची व्यक्ती exactly जे काही feel करतीय ना, नेमकं तेच आपण feel नाही करू शकत, हे कुठंतरी आपल्याला पक्कं ठाऊक असतं. त्याच्या लाईफ मध्ये काय सुरू आहे, त्यातलं चांगलं वाईट हे त्यांच त्यालाच ठाउक असतं. खरंच त्याची नेमकी मनस्थिती कुणीही समजू शकत नाही. अशावेळी त्याला आधार देण्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो, ते म्हणजे दोन चार आश्वासात्मक आणि तू एकटा नाहीयेस, आम्ही आहोत सोबत सदैव, याची जाणीव करून देणारे शब्द.! खरंच, एक गोष्ट मात्र खरी की, कुणाच्याही आयुष्यात शंभर टक्के वाईट कधीच घडत नाही... आपल्या शेकडो दुःखांना पुरून उरेल, अशी एक सुखाची बाजू आपल्या सर्वांना मिळालेली असते. फक्त आपण ती शोधली पाहिजे, मनसोक्त जगली पाहिजे.! 
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..