धग १३/०५/२०२३
आवडत्या व्यक्तीची होणारी क्षणिक भेट, कडक उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळी धो धो बरसणाऱ्या पावसासारखी भासते. हवेत गारवा पसरतो, तेवढ्या पुरताच जीवाला असीम आनंद मिळतो. पण पुढला दिवस उजाडला की पुन्हा एकदा रणरणत्या उन्हाची तीच धग अनुभवायची असते, अन् असे उन्हाळी पाऊस सारखं सारखं पडतही नाहीत ना.! 🎭
#आयुष्य_वगैरे