शेवटची ओढ

कित्ती आटापिटा केला होता मी, कित्ती गयावया करत होतो. कुठंतरी माझ्याही सहनशक्तीचा अंत जवळ आलेला होता. तू अगदीच निर्विकार वागत होतीस‌. माझे पाण्याने डबडबलेले डोळे, दाटून आलेला हुंदका यातलं काहीच तुला न दिसावं, याच मला आजही नवल वाटते. तू निघून गेलीस तरीही मी बराच वेळ त्याच ठिकाणी उभा होतो. त्यादिवशी मी तुला दिलेली ती शेवटची साद होती., ती शेवटचीच ओढ होती.!
#अडगळ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..