किनारा.... १०/०१/२०२३
किनारा.. किना-याचं आयुष्य.!
आतुरतेने वाट पाहत, विस्तीर्ण असे बाहुपाश कायम पसरलेले, त्या एका लाटेच्या प्रतिक्षेत.! लाट येते, लाट जाते. हे अविरत सुरू असतं. नेहमीच किना-याच्या वाट्याला येणारी, अगदी काही मोजक्याच क्षणांची ती लाट, तरीही त्या भेटीची ओढ कधीच कमी होत नाही. कुणी म्हणतं.., वेडा आहे हा किनारा, त्याच्या मिठीत ती लाट, कधीच नाही सामावणार.! पण किनारा मात्र आपल्याच विश्वात रमलेला. लाट धडकून धडकून भेगा पडल्या, तुकडे तुकडे झाले तरी बेहत्तर, पण किना-याला कोरडेपणा नकोय.!
#आयुष्य_वगैरे
#एकतर्फी