देवा...
आज खूप दिवसांनी आमची भेट झाली. नेहमी सारखाच तो चिंताक्रांत आणि मी प्रश्नार्थक मुद्रेत. तीच चहाची टपरी, तोच आमचा बाकडा आणि त्याचं चहाच्या पहिल्या घोटाबरोबर ते गूढ असं बोलणं..,
देवाकडे अगदी निस्वार्थ भावनेने, सहज काही मागितलं की तो ही लगेचच ऐकतो रे. हे असलं लहानपणी वगैरे काही माहीत नव्हतं मला, पण तेव्हा देवासमोर हात जोडल्यावर सहज एकदा बोलून गेलो होतो की, देवा... तिचा विसर न व्हावा..!! बस्स, त्यानंतर आज अखेर देवासमोर हात जोडून आणखी काही मागितलं नाही.! मी हरवून गेलो होतो. 'ती' कुणीतरी आत्ता त्याच्या आयुष्यात आहे की नाही.? या विचारात हरवून गेलो होतो. एव्हाना तो चहा संपवून झपझप पावलं टाकत दिसेनासा ही झाला होता आणि माझी पावलं काही केल्या तिथून उचलत नव्हती.!🎭
#आयुष्य_वगैरे
#त्याच्या_मनातलं