घर
घरामध्ये वर्षानुवर्षे एखाद्या गोष्टीला एक ठराविक अशी जागा ठरलेली असते. कालांतराने त्याची ती जागा जरी बदलली, तरीही इतक्या वर्षांच्या सवयीमुळे नकळत आधी आपण त्याच मूळ जागी जात असतो अन् दोन चार पावलं जातो न जातो तितक्यात थबकून मागे वळत असतो. जिथं एखाद्या निर्जीव वस्तूतही सवयीमुळे आपला इतका जीव अडकलेला असतो, तिथं मग आपल्या जीवाभावाची माणसं आपल्यात नसताना जीवाची होणारी घालमेल आणि तगमग याने शरीर आणि मन सतत धुमसत असते.! याची धग कुणाला दिसतही नाही अन् जाणवतही नाही.🎭
#आयुष्य_वगैरे