वेड...!! ११/१२/२०२२
कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीपासून कितीही दूर असलो, तरी त्या नात्यात काहीही फरक पडत नाही. कधी कधी दररोज बोलणं होतं, तर कधी कधी बरेच दिवस काहीच बोलणं ही झालेलं नसतं, तरीही एक अनामिक ओढ कायम असतेच. आपल्या दैनंदिन दिनचर्येत कळत नकळत आपण त्याला/तिला आठवत असतोच. अशावेळी आपण शेवटचं कधी बोललो/भेटलो होतो.? त्यावेळच्या आठवणी, वा त्यावेळच्या बोलण्यातील एखादी गंमत आठवून, आपण नकळतपणे एखाद्या क्षणी, एकटेच हलकसं हसूनही जातो. मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या त्या नात्याप्रमाणेच, ते हसूही अनमोल असतं. 🎭
#आयुष्य_वगैरे
#वेड 🌼🌼🌼