आपलं हक्काचं माणूस..

आपल्या माणसांना जपण्यासाठी विशेष प्रयास कधीच करावे लागत नाहीत, ते आपोआप घडत जात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती परमेश्वराने द्यावी, जिच्यासाठी आपण प्रेमासारखी सुंदर भावना ठेऊ शकू .खरंच प्रेम व्यक्तीला खूप छान बनवत, कारण अशा व्यक्तीच आपल्या आयुष्यात असणं, तिच्यासाठी काही करताना मिळणार समाधान व्यक्तीशः तुम्हालाही एक मानसिक सकारात्मक दृष्टीकोन देऊन जात. तो आनंद शब्दांत व्यक्त करण कठीण. मुख्य म्हणजे वाईट वृत्ती नकळतपणे दूर जातात. आपल भाव विश्व आपल्या व्यक्तीभोवतीच विणलं जात, किंबहुना जगण्याचा खरा उद्देश हेतू खऱ्या अर्थाने त्याच व्यक्तीमुळे कळतो. दिशाहीन आयुष्याला जर खरच एक परिपूर्णता यावी, अस वाटत असेल तर आयुष्यात जिच्यावर नितांत प्रेम करता येईल, अशी प्रेमाची व्यक्ती असणं ह्याशिवाय दुसरा उपाय नाही.!  🎭
#आयुष्य_वगैरे 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..