प्रेम म्हणजे...
मला एकानं विचारलं की., दादा, प्रेम आहे तर मग त्यांनी physical होणं खरंच खूप महत्त्वाचे आहे काय रे.?? त्यावर मी त्याला म्हणालो की, तसं काही नसतं रे. हे प्रेम वगैरे आपण काय फक्त शरीर सौंदर्याला भुलून अथवा फक्त शरीर सुखासाठीच केलेलं असतं काय.? आपण एखाद्याच्या प्रेमात आहोत, म्हणजे नेमकं काय.? हे आपलं आपल्यालाच माहीत नसतं आणि कुणी हा प्रश्न विचारला, तर त्याचा उलगडा आपल्याला नीटसा करताही येत नाही., बरोबर ना.!? हां पण एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे मित्रा की., Physical होणं ही एक मर्यादा आहे, ठराविक वेळेआधी आपण ती पाळलीच पाहिजे. आपण एकमेकांना आयुष्यभरासाठी बांधिल होण्याआधी हे करत असू, तर नंतरच्या आयुष्यात त्याच काहीच नाविन्य राहणार नाही. आणि जर फक्त प्रेमच असेल आणि आपण कधीच एक होऊ शकत नाही, हे ही ठाऊक असेल, तर मग ही मर्यादा कधीच ओलांडू नये.! फक्त प्रेम करतं रहावं आयुष्यभर, सोबत राहून मित्र बनून, सुखदुःखाचा साथीदार बनून.! मित्रा.., एक तत्व मी नेहमी पाळत आलोय, ते तू सुद्धा पाळ.., ' माणसानं लग्नाआधी हनुमान असावं आणि लग्नानंतर राम..!!🎭
#आयुष्य_वगैरे