चारचाकी २४/०४/२०२३

तसा माझा नेहमीचा प्रवास लालपरीनेच., पण कधीतरी मित्राच्या गाडीतून विरंगुळा म्हणून किंवा मग एखाद्या परिचिताने अचानक गाडी थांबवून दिलेली लिफ्ट, या योगाने चारचाकीचा अल्पसा प्रवास माझ्या वाट्याला येतो. अशावेळी गाडीत बसताना नेहमीप्रमाणे सर्वात आधी माझ्या डोक्याला मार लागतो. गाडीत बसल्यानंतर दरवाजा नीट लॉक झाला आहे की नाही, हे पाहण्यात मी दोन चार मिनिटे गाडी थांबवून ठेवतो. त्यानंतर सीट बेल्ट लावताना तर पार गोंधळ उडतो, कुणीकडून काय ओढायचं आणि कशात काय अडकवायचं हे काहीच कळत नाही. मग मित्रच पुढे सरसावून सारे सोपस्कार पार पाडतो. प्रवास सुरू झाला की मग काचा खाली वर करायचं बटन अजिबात सापडत नाही. तेव्हा सहज मनात येऊन जातं की, एवढ्या मोठ्या गाडीत, ही अतिशय महत्त्वाची अशी बटणं, इतकी छोटी का असतात आणि लपवून का ठेवलेली असतात.? आणि माझी ही सारी उठाठेव सुरू असताना, तिथं समोरचं ठेवलेलं एक खेळणं मान हलवून हलवून, दातं काढून हसत माझ्याकडे पाहत असतं.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#चारचाकी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..