२१ जुलै २०२२

आठवणींच्या गावाला जाणारी पाऊलवाट असते नागमोडी वळणाची, तर कधी ओबडधोबड, तर कधी अगदी एका सरळ रेषेत. ही पाऊलवाट असते तर खूप छोटीशी, पण ती वाट संपल्यानंतर नजरेस पडणारा तो गाव किती समृद्ध असतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला किती समृद्ध करून जातो, हे ज्याचं त्यालाच चांगलं ठाऊक. तिथं होणारा भावनांचा आविष्कार कधी शब्दांत मांडतो येतो, तर कधी शब्दांपलीकडे असतो, फक्त नि फक्त अनुभव घेण्याजोगा. इथं खोटेपणाला अजिबात जागा नसते. या गावाला दिलेली भेट प्रत्येक वेळी जगणं समृद्ध करून जाते, जगण्याचा एक नवीन अनुभव देते.

#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..