#प्रेम_आई 💓

दररोज सकाळी कामावर जाताना, मला आईला हसताना पहायला जाम भारी वाटत. कधी कधी काहीच कारण नसतं, किंवा कधी कधी मुद्दामहून मीच काहीतरी बोलून, वागून वगैरे तिला हसायला भाग पाडतो. मी आतल्या रूममध्ये लुडबुड करीत असतो, आणि आई रूमच्या चौकटीला बिलगून, अलगद थोडीशी मान झुकवून एकटक माझ्याकडे बघत असते आणि एकसारखी कित्ती गोड हसत असते. तिच्या डोळ्यांतला तो आनंद काय वर्णू.११ लय म्हणजे लय भारी वाटतं तेव्हा. तेव्हा जाम भारी लाजते ती, प्रेमाने दोन चार शिव्याही देते तेवढ्या सकाळी सकाळी, पण सकाळी घरातून बाहेर पडताना, आईला तसं खळखळून हसताना पाहिलं की, कधी कधी सगळ्या दिवसाच, तर कधी कधी आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटतं.!
#प्रेम_आई 💓
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..