२३/०४/२०२३

प्रेम असो, पैसा असो वा कुणी व्यक्ती, यांची सोबत असताना कधीच कदर केली जात नाही. कधी कधी आपण नको तिथं, नको तितकं गुंततो, तर कधी जिथं खरंच गुंतलं पाहिजे, अशा ठिकाणी साफ साफ दुर्लक्ष करतो. कधी कधी आत्ता आहे तो क्षण जगण्याच्या नादात, तर कधी कधी भविष्याच्या नादात वर्तमान क्षणाकडे, दुर्लक्ष करणं सतत सुरू असतं. मग एकदा का उचित वेळ निघून गेली की, शेवटी हाताशी काहीच उरत नाही. आपण तेव्हा फक्त आठवणी कुरवाळत बसतो. क्षणभंगुर सुखाच्या नादी लागून आपण स्वतःला अमर समजू लागलेले असतो, आपण जन्माला आलो, तेव्हाच आपल्या मरणाची तारीखही ठरलेली आहे, हे पुर्णपणे विसरून गेलेले असतो. तसं सगळं काही नश्वर, तरीही अगदी शेवटपर्यंत आपणं, सारं काही माझं माझं करत असतो.
जिंदगी..., जब मरना चाहें तो मौत नहीं आती, और जब जीना चाहें तो चैन से जीने नहीं देती..!! 🎭
#आयुष्य_वगैरे
#कायपण
#मनात_येईल_ते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..