वेड...!! ०९/०१/२०२३
प्रेम तिनेही केलं, प्रेम त्यानंही केलं. वेड तिच्यातही होतं, वेड याच्यातही होतं. पण सत्यानं केलेलं प्रेम हे सर्वस्व उधळून, सारं काही विसरून केलेलं होतं. तर श्रावणीचं प्रेम सत्य स्वीकारून, आपल्या असलेल्या एकतर्फी प्रेमासाठी स्वतच अस्तित्वच विसरून, नाकारून, सगळं काही सांभाळून ठेवणारं, हातचं काहीही निसटू न देणारं असं होतं. शेवटी एक मात्र खरं की, एखाद्या निशा साठी वेडे असणारे सत्यासारखे गल्लोगल्ली खूप सापडतील, पण एखाद्याचं आपल्यावर #प्रेम नसतानाही, फक्त आणि फक्त त्याच्यावरच प्रेम करणारी, ते जपणारी, #श्रावणी फारच दुर्मिळ.! आपल्यावर असं वेड्यासारखं प्रेम करणारं, कुणी तरी आपल्या वाट्याला यायला खरंच खूप नशीब लागतं.!
#आयुष्य_वगैरे
#एकतर्फी