इतक्या रणरणत्या उन्हातही अनवाणी पायांनी चालत असलेली काही लोक नजरेला पडतात, तेव्हा त्यांच्या अनवाणी पायाला होणा-या चटक्यांच्या जाणीवेने मन पुरतं होरपळून जातं.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
आता सारं काही जवळपास संपल्यातच जमा होतं. तरीही का कुणास ठाऊक, पण त्यादिवशीच्या तुझ्या हसण्यामागचं कोडं काही केल्या मला सुटत नव्हतं. त्यादिवशी आपली कोर्टातील ती शेवटची तारीख होती. काही वर्षे का असेना, पण आपण सुखदुःखाचे क्षण एकत्र जगलेले होते. अशा ब-याच कडू गोड क्षणांची मी तिथं उजळणी करत बसलो होतो. त्यावेळी कधी अचानक मला खूप हसू यायचं, तर कधी आतल्या आत माझं मन हंबरडा फोडून रडायचं. पण सहज तुझ्याकडे नजर गेली की, मी सगळं काही विसरून जायचो. आणि तेव्हा वाटायचं की हिला काहीच कसं काय वाटत नाहीये? इतक्या वर्षांचा आपला संसार आज शेवटच्या घटका मोजत असतानाही, ही बाई इतकी निर्विकार आणि हसतमुख कशी काय असू शकते? तो दिवस आणि त्यानंरचे काही दिवस असेच निघून गेले, पण त्या तुझ्या हसण्याचं गूढ मला काही केल्या अजूनही सुटत नव्हतं. आपले नंबर एकमेकांकडे सेव्ह असूनही मध्यंतरी बरीच वर्षे आपलं कसल्याही प्रकारचं बोलणं, वा साधा मेसेज ही नव्हता. तरीही एकदा तरी शेवटचं भेटावं आणि बोलावं म्हणून मी तुला आज इथं भेटायला बोलावलं आहे. मी - (तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत) अगं, कशी आहेस.? ती - (माझ्याकडे न बघताच) कशाला बोलाव...
एकत्र राहून सतत खटके उडायचे, म्हणून दादा वहिनी वेगळं राहत होते. दादा भाड्याच्या खोलीत रहायला गेल्यापासून आता जवळपास ५ वर्षे व्हायला आली होती. आणि वेगवेगळे राहिल्यापासून भांडणतंटे कमी होऊन नात्यात गोडवा ही वाढू लागला होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. गेल्या काही वर्षांपासून दादा ज्या आनंदाच्या शोधात होता, तो आनंद आता त्याला खुणावत होता. वहिनीची डिलिव्हरी जवळ आली होती. तेव्हापासून आईवडिलांचं तिकडं येणं जाणं वाढलं होतं. पण घरातल्या सर्व भांडणांना आधीपासूनच मला दोषी धरण्यात आल्यामुळे मी मात्र तिकडे जातच नव्हतो. आईवडिलांच्याकडून दादा वहिनीची ख्यालीखुशाली जाणून घ्यायचो, बस्स इतकंच. शेवटी आपलं माणूस कुठे का असेना, सुखी असेल तर बस्स. आपल्याला आणि काय हवं.? आणि एकदाचा तो दिवस उजाडला. पहाटे पहाटे पप्पांना दादाचा फोन आला, आणि मी काका झालो. सगळं घर आनंदाने नाचू लागलं होतं. वहिनी आणि बाळं दोघेही सुखरूप होते. पण का कुणास ठाऊक, बाळाला काचेच्या पेटीत ठेवलं होतं. आईवडिलांना आभाळ ठेंगणं झालं होतं. एव्हाना छोट्या मोठ्या कामाने दमणारे आईबाबा दवाखान्यात धाव धाव धावत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर ...
आज एक गोष्ट लक्षात आली काय गं तुझ्या.? आज माझा सकाळचा मेसेज तुला पहाटे पहाटे जवळपास साडेचार वाजता आलाय.तो आज इतक्या लवकर का आला माहिती आहे. कारण तू स्वप्नात आली होती. काहीतरी बोलायचं आहे म्हणून, मला वाडीवर भेटायला बोलावली होती. तिथं आपण भेटल्यावर... तू - कडू.. हाणला पाहिजे रे तुला. काय झालंय एकदमच. खूप वेगळा वेगळा वागत आहेस, आणि वाटतही आहेस. मी - काय कुठं.! उगाचच काहीतरी विचार करत बसू नकोस. तू - मी खुळी नाहीये, सगळं कळतं मला. तुझं तूच विचार करून बघ. मी - अगं., खरंच तसं काही नाहीये, अगदी नॉर्मलच आहे मी. तू - हेच हेच तर तुझं वागणं खटकते आहे मला. आधी असा नव्हता तू. आधी असं पलटून उत्तर देत नव्हता मला. आणि उगाच मला बोलायला लावू नकोस हं. तुझं काय चुकते आहे ते तुझं तूच कबूल कर पाहू पटकन, नाहीतर हाणते बघ बुक्का..! मी - अगं, आता कसं समजावू तुला. तसं काहीच नाहीये. तू - ऐ, उगाच तापवू नकोस हं मला. मग मार खाशिल ते वेगळं आणि बोलून ही खूप घ्यावं लागेल हं श-या..! मी - हसत हसत, आहाहा... तुझ्या तोंडून माझं नांव ऐकायला कित्ती मस्त वाटतं मला.... तू - कडू.. विषय बदलू नकोस. आता मी काय सांगते ...