गावाकडच्या गोष्टी २६/०४/२०२४
गावात दिवसातून एकदा दोनदा येणारी #लालपरी निपचित पडलेल्या गावाला नवसंजीवनी देऊन जाते. तोंडाचं मोकळं बोळकं घेऊन पारावर बसलेली मंडळी, डोळे मिचकावत कोण आलं, कोण गेलं, याकडे लक्ष देत असलेली. ही त्या पाटलाची सून, ह्यो त्या तेल्याचा जावई, हे गावावरून ओवाळून टाकलेलं बेनं वगैरे. तितक्यात #लालपरी ची डबल बेल वाजते आणि पुन्हा एकदा पारावर शांतता पसरते. आणि मग पुन्हा पारावर चर्चा सुरू, आता पुन्यांदा यष्टी कवा हाय रं.?? आता थेट सांच्यालाच, मुक्काम गाडी.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#गावाकडच्या_गोष्टी