जीना ईसी का नाम हैं..

आपल्याला सतत वाटत असतं की, आपलीच लाईफ खूप tough time मधून जात आहे, आपल्या इतके problems आणि tension इतर कुणाच्याही आयुष्यात नसतील, प्रत्येकाचं दुखणं आणि त्याचा त्यांच्यावर परिणाम हा व्यक्तीपरत्वे वेगवेगळा असतो हे मान्यच, तरीही how u react आणि how u accept ur condition & handle it, हे ही तितकेच महत्वाचे असते. आज असाच एक छोटासा प्रवास, पण खूप मोठ्ठं काहीतरी सांगून गेला. प्रवास, तो ही अॉटोचा. मागे बसायला जागा नव्हती, म्हणून मग पुढे जाऊन चालकाशेजारी बसलो. मागच्या बाजूला चालकाच्या ओळखीची एक व्यक्ती होती, अधेमध्ये त्यांचं संभाषण सुरू होतं. ती व्यक्ती चालकाच्या तब्येतीची चौकशी करीत होती. त्या दोघांच्या बोलण्यातून माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती की, याला इतकं नेमकं झालं तरी होतं काय.? म्हणून मग मी थेट चालकाशी बोलू लागलो. तो माझ्यापेक्षा थोडासा वयस्क दिसत होता, म्हणून मग त्याला 'दादा' असं संबोधून मी विचारपूस केली. तो सांगू लागला., ''माझं आयुष्य मस्त मजेत चाललेलं. आधी लुकडा होतो, मग जिम लावली, चांगलं शरीर कमावलं, आणि योगायोगाने, माझ्या कमावलेल्या त्या सुडौल शरीराचं बक्षीस म्हणून, मला त्याच जिममध्ये, जिम ट्रेनर म्हणून जॉब ही मिळाला. त्या कामाच्या जिवावरच दोन वर्षांनी माझं लग्नही झालं. सोन्यासारखी एक मुलगी अन् मुलगाही झाला. इतकं सारं काही अगदी स्वप्नंवत सुरू असताना, एके दिवशी मला, एका मित्राकडून दुबई येथे आणखीन जास्त चांगली व गलेलठ्ठ पगाराची अॉफर आली. त्यासाठी त्याने दीड लाख रुपयांची मागणी केली. सध्या जेवढं मिळतंय तेवढ्यात मी समाधानी असल्याने आधी मी नकार दिला, पण नंतर वाटू लागले की आत्ता सगळं ठीक आहे, पण भविष्यात आपले खर्च वाढणारच आहेत. दोन मुलांचे शिक्षण, चुकून कुटुंबातील एखाद्याचं मोठ्ठं आजारपण, यासाठी गाठीला पैसा तर हवाच, म्हणून मग काही दिवसांनी मी त्या मित्राला होकार कळविला आणि दीड लाख रुपये बाहेरून व्याजाने काढून त्याच्या हाती दिले, आणि तिथंच माझा घात झाला. काही दिवसांनी तो कुठल्या कुठे गडप झाला. थोडी चौकशी केली असता कळले की, त्याच वेळी त्याने आणखीन सात जणांना अशाच पद्धतीने फसवले आहे. फार नैराश्य आलं. व्याजावर काढलेलं दीड लाख, त्याच व्याज आणि प्रपंच यांचा काहीच मेळ बसेना. मला बीपीचा त्रास सुरू झाला. औषधोपचार सुरू केले. तरीही विस्कटलेली आर्थिक घडी काही केल्या सुरळीत होत नव्हती. अशातच जवळपास दीडेक वर्षे मी बीपीची औषधे घेण्यात टाळाटाळ केली आणि एक दिवशी मला कळलं की माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. माझं वय आत्ता ४२ वर्षे. जवळपास सहा वर्षे व्हायला आली आता या गोष्टीला. मी दिवसभरात फक्त एक ग्लास पाणी पितो. आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करून येतो. मध्यंतरी एकदा heart attack आला होता. जवळपास सगळं संपल्यात जमा म्हणून घरी रडारड ही सुरू झाली होती, पण तितक्यात कसं कुणास ठाऊक, कुणीतरी प्राण फुंकल्यागत पुन्हा माझा श्वास सुरू झाला. गल्लीत आजही सगळे मला म्हणतात की, देवाच्या दारी जाऊन फक्त दारावरची बेल वाजवून परत आलाय हा. आता जिम ट्रेनर म्हणून कामाला नाही मी, आणि माझी आत्ताची तब्येत पाहून कुणालाही खरं वाटणार नाही की, हा एकेकाळी जिम ट्रेनर होता. पण आता इतक्या वर्षात एक गोष्ट मात्र कळलीय की, that's life.., u have to accept it, as it is.!!" माझा स्टॉप जवळ आला होता, मी उतरलो. त्याला भाडं दिलं. आणि त्याला म्हणालो की, भावा.., मानलं तुला आणि तुझ्या जिद्दीला. मग त्याच्याशी हस्तांदोलन केलं, आणि त्याचा निरोप घेतला. चार पाऊले पुढे जाऊन मागं वळून पाहिलं तर, मला माझे किरकोळ problems, मी जिथं उतरलो, त्या तिथंच रडत बसलेले दिसले.🎭

#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..