स्पर्श..
कितीही आठवलं तरी, काहीच आठवत नाही आता. तुझा घरामधला वावर, तुझ्या हातातील बांगड्यांची किणकिण, त्या पैंजणातील निवडक अशा घुंगरांचा आवाज, धुणं भांडी झाल्यावर तुझ्या हातांना येणारा तो विशिष्ट मोहक सुवास, तासभर एकसारखं पाण्यामध्ये असल्यामुळे, पांढरे फटक पडलेले तुझे गोरे गोरे पान हात-पाय, त्या तशाच ओल्या गारेगार हातांनी, तुझं माझ्या गालांना स्पर्श करणं, आणि तुझा तो नेहमीच मला हवाहवासा वाटणारा असा स्पर्श ही..!!
कितीही आठवलं तरी, काहीच आठवत नाही आता.!
#आयुष्य_वगैरे #गंध_आठवणींचा