दिवास्वप्नं...!! २८/०५/२०२३

हे नेहमीच असं होतं,

तुझ्या आठवणींचा एखादा डोह जणू, अन् माझ्या मनाची नौका त्यात सतत दोलायमान स्थितीत.

तुझ्या आठवणींनी कुठल्याही क्षणी हक्कानं यावं, आणि माझ्या मनावर अधिराज्य गाजवावं अशा सा-या तुझ्या आठवणी. कधी कधी हा डोह शांत असतानाही, माझं प्रतिबिंब मला त्यात दिसत नाही, तिथं दिसतेस तर फक्त तू आणि तूच.! तुला तर माहीतीये, मग शांतपणे टक लावून एकसारखं पाहत असतो मी तुला, नेहमीप्रमाणेच!

तुला अन् तुझा चेहरा पहायची माझ्या मनाची तृष्णा, मग भागतच नाही, तुला एकटक कितीही वेळ पाहिलं तरीही.

तिथं आपलं सारं बोलणं डोळ्यांनी होतं, पण तुझं लाजणं आणि सतत नजर चोरणं न्याहाळत, मी माझी नाव, त्या डोहात अलगद हाकतच असतो. तेव्हा अधेमध्ये माझ्या नजरेला अचानक भिडणारी तुझी नजर, मला एखाद्या वादळासारखी भासते. मग अचानकपणे त्या डोहात उठतात तरंग, सगळं काही क्षणार्धात अस्पष्ट होऊनं जातं. दिवास्वप्न वगैरे.!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..