चैतन्य १३/०५/२०२३
मनाचं घर एकाकी, फक्त चार भिंतींचा संवाद. भिंती माणसाला आसुसलेल्या. तिथं आत जिकडे तिकडे शब्दांचा पसारा अस्ताव्यस्त पडलेला. दरवाजा कधीपासून बंद. त्यावर एक भलं मोठं मौनाचं कुलूप. आठवण नावाच्या जिवंतपणाचं अधेमध्ये येणं जाणं, तेवढंच काय ते चैतन्य. मग पसा-यातून शब्दांची जमवाजमव अन् मेलेल्या मनानं कागदाला जिवंतपण..! 🎭
#आयुष्य_वगैरे
#मनात_येईल_ते