आली माझ्या घरी ही दिवाळी...!! १७/१०/२०२२

आजूबाजूला भाजणीचे, तळणाचे वगैरे सुवास दरवळू लागले आहेत. पहिल्या फेरीत करंज्या आणि चकलीचा जास्त जोर आहे, असं सध्या तरी दिसतंय. हळूहळू बाजारपेठा ही गजबजू लागल्या आहेत. रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या रंगांच्या मनमोहक आकाश कंदीलांच्या माध्यमातून, मार्केटचा सगळा परिसर तर अगदी झगमगत्या तारांगणासारखा भासतो आहे. ठिकठिकाणी किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती घडवल्या जात आहेत, तिथेच, अगदी बाजूलाच सैनिकांच्या फौजा तयार उभ्या आहेत, हत्ती, घोडे, उंट, वाघ, हरीण, मगर मानवी वस्तीत अगदी निवांत बसलेले आहेत., हो.., #दिवाळी जवळ आलीय.!!🎭
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..