वेड....! ०५/०८/२०२२

तुझा माझ्याकडे असलेला, माझा आवडता फोटो, मी एकांतात असताना एकटक पाहत बसतो. मी तुला पाहतोय, हे तुला कळायला नको, म्हणून मग हलकेच माझ्या हाताने तुझे डोळे झाकतो. मग हळूहळू ते जुने दिवस आठवत, जेव्हा तू समोरून जायची, मी फक्त तुला पहायला, तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलेला असायचो, त्यात हरवून जातो. मग अचानक आठवणींचा भोवरा तयार होतो, त्याच्या तळाशी मी स्वतःला पाहू लागतो. हळूहळू सारं काही शांत होत जातं, निवळतं, मी तसाच असतो, तळाशी.!
#वेड #आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..