कुबेराचा खजिना..

मनात आलेलं बरंच काही, ब-याचदा वेळेअभावी लिहायचं राहून जातं. पण कागदावर न उतरलेल्या, मनात घुटमळत असलेल्या त्या शब्दांची, बाहेर पडायची धडपड काही केल्या कमी झालेली नसते. मग कधीतरी एखाद्या निवांत क्षणी, स्वस्थ बसून असताना अचानकपणे सगळं सगळं काही आठवू लागतं. आख्खं आयुष्य दारिद्यात काढलेल्या एखाद्याला कुबेराचा खजिना सापडावा, तसं काहीसं मग तेव्हा वाटतं. स्वप्नंवत वाटणारी अशी ही श्रीमंती, कधीतरीच वाट्याला येत असली तरी, ते सुख अगदी जसच्या तसं नेहमीच शब्दांत मांडता येत नाही.! 
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..