विरंगुळा...! ०४/०१/२०२३
रोजच्या जगण्या पलीकडेही आपल्या मनाचं एक भावविश्व असतं. त्या भावविश्वात काहीतरी हरवण्या सापडण्याचे प्रसंग सतत आपल्या सोबत घडत असतात. आपल्या प्रत्येक दिवसाच शेड्युल तसं ठरलेलंच असतं, आणि शेड्युल म्हटलं की अगदी घड्याळाच्या काट्यावर नेमून दिल्याप्रमाणे तोचतोचपणा आलाच. मग या सा-यातून विरंगुळा म्हणून, एक हक्काची मधली सुट्टी म्हणून, फक्त आपला असा एक क्षण, अधेमध्ये सतत आपल्या वाट्याला येत असतो. तो क्षण म्हणजे कुणाचीतरी अचानक येणारी आठवण, क्षणार्धात आपल्या डोळ्यांसमोर उभा राहणारा त्याचा/तिचा चेहरा, आणि नकळतपणे आपल्या चेहऱ्यावर खुललेलं हसू.! खरंच, सर्व काही विसरायला लावणारा, बेभान होऊन हरवून जायला लावणारा, असा एक तर वेडावणारा विरंगुळा माणसाला हवाच, नाहीतर माणसं ठार वेडी होतील.!
#आयुष्य_वगैरे