माणूस

आपल्या वागण्याचा कधी कधी आपल्यालाच ताळमेळ लागत नाही. आपण जे वागलो, बोललो, ते चूक की बरोबर काहीच कळत नाही. Heat of the moment म्हणून आपण त्याकडं कानाडोळा करत असतो. आपल्या मनाला पटत नसतानाही, एखाद्या व्यक्तीचा अथवा त्यांच्या ठराविक गोंष्टींचा, वागण्या बोलण्याचा आपल्याला त्रास होतो, हे माहीत असूनही त्यांच्यांशी नेहमी आपण सबुरीने, सामंजस्याने व प्रेमाने वागत असतो, आणि याउलट जी व्यक्ती अगदी निस्वार्थपणे आपल्याला जीव लावते, प्रेम करते, आपण जराही दुखावले जाऊ नये याची काळजी घेते, अशा व्यक्तींनी आपण कायम  त्यांना गृहीत धरून, आपल्याशिवाय त्यांच पानही हलत नाही असं समजून त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष करीत, तुटक तुटक वागत असतो. आपल्या नकळत आपण त्यांच्यावर मालकी हक्कच गाजवत असतो, आणि ते सुद्धा मोठ्या मनाने आनंदाने स्वीकारत असतात. तरीही कधीतरी आपल्या अशा वागण्यचा आपल्याला पश्चात्ताप तर खूप होत असतो, क्षणार्धात आपण माफीही मागितलेली असते, तरीही आतल्या आत आपलं मन सतत आपल्याला खात असतं. असं वागायला नको होतं आपणं, असं बोलायला नको होतं आपणं.! खरंच.. गोष्ट हातातली होती, पण आपल्या त्या तेवढ्याशा छोट्याशा क्रोधाच्या, अहंकाराच्या, मोहाच्या क्षणापायी होत्याचं नव्हतं झालेलं असतं. सारवासारव करूनही सारं काही पाहिल्यासारखं होईलच याचीही खात्री नसते.!

#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..