तडजोड... २९/११/२०२२
त्याच्या त्या दोन ओळी मला नेहमी आठवतात. काही वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं त्यादिवशी, त्याने whatsapp स्टेटस म्हणून, त्या ओळी लिहून ठेवल्या होत्या. अशा होत्या त्या ओळी,
"मी तुला वाटत असलो कितीही गोड..,
तरीही तू माझ्या आयुष्यातील आणखी एक तडजोड.!!"
पण आता ज्या ज्या वेळी तो मला भेटतो, त्यावेळी सध्या तो या तडजोडीची मोजत असलेली किंमत सतत जाणवते. तो ही आपल्यातल्याच, आपल्यासारखा एक सामान्य माणूस, पण जिथं सामान्य माणसाच्या, अतिशय सामान्य अशा स्वप्नांना सुरूंग लागतो ना, तिथं त्याला धड जगताही येत नाही अन् मरताही. अखेरच्या श्र्वासापर्यंत फक्त फरफटच होत असते. तडजोड या गोंडस नावाखाली आपल्या एखाद्या अविरत भळभळणा-या जखमेवर मलमपट्टी करावी, तसं एखादं नवीन नातं आपण स्वीकारतो. पण कित्येकदा जखम बरी तर होतच नाही, आणखीनच चिघळत जाते.!!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ
#त्याच्या_मनातलं