तारीख पे तारीख..
सिनेमाच्या जगात कोर्ट कचेरीचं जे चित्र आपल्यासमोर उभं केलं जातं ना, ते खूप वेगळं आहे. ख-या आयुष्यात त्यातला फक्त आणि फक्त एकच भाग तंतोतंत लागू होतो, आणि तो म्हणजे "तारीख पे तारीख..
तारीख पे तारीख...
तारीख पे तारीख और
तारीख पे तारीख मिलती रही है....
लेकिन इंसाफ़ नही मिला माई लॉर्ड.!
इंसाफ़ नही मिला.... मिली है. तो सिर्फ़ ये तारीख.!"
जी माणसं खूप आशेने, आपले घरगुती अथवा इतर तत्सम विषय घेऊन कोर्टात जातात, त्यांना तिथं किंमत शून्य असते. वकील सोबत असल्याशिवाय कुणीही दखल घेत नाही. भटक्या कुत्र्याप्रमाणे बाहेर हुसकावलं जातं. ज्यांच्यासाठी हे सारं काही सुरू आहे, त्यांना तर फारच कमी प्रमाणात बोलू दिलं जातं. असे कित्येक हताश, निराश चेहरे दररोज माझ्या डोळ्यासमोर असतात. मंदिर मशिद असो वा एखाद्या - नेत्या - अभिनेत्याचा विषय असो, तिथं तत्परता दाखवत लवकरात लवकर प्रकरणाचा निपटारा करणारं कोर्ट सामान्य माणसाला मात्र तारीख पे तारीख..
तारीख पे तारीख...
तारीख पे तारीख देत, त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहत असतं. सगळेच खटले एकसारखे नसतीलही, पण आपल्या सोबत अन्याय झालाय, या भावनेनं न्याय मागायला आलेला एखादा माणूस,
या हेलपाट्यात पार खचून जातो.
#त्याच्या_मनातलं
#आयुष्य_वगैरे