मनातलं आभाळं..
इतरांच्या दुःखात आपलं दुःख, आणि सुखात आपलं सुख शोधणारी माणसं तशी विरळच, तरीही कधी कधी, एखाद्याचं सुख बघूनही नकळत आपले डोळे पाणावतात. तेव्हा खरंतर भरून आलेलं मनातलं आभाळ डोळ्यांवाटे कोसळतं. एकांत असेल तर हे कोसळणं वळीवाच्या पावसाप्रमाणे वादळी, गरजून, हांबरून असतं, आणि माणसांचा गोतावळा सोबतीला असेल तर, एखाद्या श्रावणसरी सारखं, ऊन पावसाशी लपंडाव करत बरसण्यासारखं असतं.
शेवटी सुख असो वा दुःख,
ते सुध्दा पावसासारखचं असतं,
बरसणं जरी एकसारखं असलं,
तरी प्रत्येकाचं भिजणं मात्र वेगवेगळं असतं.!
#आयुष्य_वगैरे