ओ काका..
मनानं तरूण असणारे आपण शरीरानं थकू लागलोय, हे स्वीकारायला आपलं मन कधीही तयार नसतं. आपल्या वागण्या बोलण्यात, दिसण्यात होणारे बदल याकडे आपण जरी दुर्लक्ष करीत असलो तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांचे या गोष्टींवर फार बारीक लक्ष असते. यातूनच कधी कधी आपल्यासाठी नेहमी आपल्या कानावर पडणारी 'ऐ' अशी हाक, मग 'अहो' अशी बदलून जाते, हे आपल्या सुद्धा लक्षात येत नाही.!