आई-बाबा

माझी आई नेहमी एक वाक्य बोलते.,
" आपलं बाळं आपल्या मांडीवर मुतलं,
म्हणून मांडी कापून टाकून चालेलं काय.?"
आपण जन्माला आल्यापासून नेमकं याच तत्वाने
आई-बाप मुलांसोबत वागत असतात.
आपल्या कित्येक चुकांवर पांघरूण घालत असतात.
मुलं त्यांच्याशी कशीही वागोत, पण आई-वडिलांच्या, त्यांच्या मुलांप्रती असलेल्या निस्वार्थ प्रेमात
तसूभरही फरक पडत नाही.
आपल्या काळजाच्या तुकड्यांचं
आपल्या डोळ्यासमोर सारं काही व्यवस्थित पार पडावं, त्याचा संसार गाडा व्यवस्थित पळावा,
यासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
आई-वडिलांची धडपड सुरू असते.!🎭
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..