aal izz well

दिवसभर सोबत घेऊन फिरलेला हा सगळा मनातला पसारा आहे. घरात लय पसारा झाला की तो आपण आवरतो, घर साफ होत, आणि मी मनात लय पसारा झाला की तो मोबाईलच्या Notes मध्ये उतरवतो, मन हलकं होतं.
आईच्या पोटातून बाहेर आल्यावर आपण जे रडतो ना, ते काही उगाच नसतं. ती तर फक्त सुरूवात असते. जन्माला येतो तेव्हा नाव नसतं, आणि जेव्हा आपण मरतो तेव्हा फक्त नावच राहतं. मुळातच आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे परिक्षा द्यायला, निर्णय घ्यायला. आणि हे सारं करता करता आपली जी काही वाटचाल सुरू असते, त्याला आपण जगणं म्हणतो. चढ उतार येत असतात आणि आपला प्रवास सुरू असतो. आपल्या आयुष्यात एक झालं की एक, एक झालं की एक काही तरी problem सतत सुरू असतात. आपण त्याला कर्माची फळ किंवा भोग म्हणून सोसत असतो. कुणी जिंदादिल त्याला "जीना इसीका नाम है" म्हणून पाठीवर टाकून पुढं जातो, तर कुणी "नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते" या भावनेने सदैव त्यासाठी तयार असतो. 
एखादी गोष्ट आवडल्यावर लहान मुलं कसं कंटाळा येईपर्यंत त्या वस्तू सोबत खेळत असतं आणि मग मन भरलं, कंटाळा आला की ती गोष्ट टाकून देतं आणि पुन्हा त्या गोष्टी कडे ढुंकूनही पाहत नाही. आपल्या बरोबर असंच काहीसं देव करत असतो. देवानं दिलेला हा जन्म लोखंडासारखा आहे आणि हे जग एक तप्त भट्टी आणि देव लोहार. कठीण परिस्थिती आणून सतत आपल्याला तापवायचं, सतत घणाचे घाव घालायचे आणि आपली सहनशीलता पहायची, निर्णय क्षमता पहायची. आणि मस्तपैकी आपली मजा पहायची हेच काय ते देवाचं आवडतं काम. पण परिक्षा तर द्यायलाच लागणार. कारण पृथ्वीवर मोजताही येणार नाही एवढ्या प्रजातीत बोलता येणारी, विचार करणारी, एवढी विकसित एकच प्रजाती ती म्हणजे आपणच. So don't worry, संघर्ष है जारी.!!
( सौजन्य :- अध्यक्ष अखिल भारतीय aal izzz welll संघटना )

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..