४ जुलै, २०२१

प्रत्येक आवडीला कारण असतंच असं नाही. 
कित्येकदा आपण अमुक गोष्ट किंवा तमुक व्यक्ती का आवडते याच काही कारणं सांगू शकत नाही. पण आवडते हे मात्र नक्की.
मग बरेचदा प्रश्न पडतो की कारणं काहीच नाही तर मग त्या भावनेला अर्थ काय.? आणि खरंच आपल्याला त्याचं कारण माहित नसतं, आणि कारणांची गरजही नसते.?
कधी कधी आपण मनापासून बोललेलं सगळं खरं खरं समोरच्याला खोटं वाटून जातं. आपल्या भावने बद्दल संशय घेतला जातो. तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. अशा वेळी बुद्धांनी सांगितलेला संदेश आठवतो, ‘फूल आवडतं तेव्हा स्वत:साठी तुम्ही ते तोडून घेता, पण जेव्हा तुमचं फुलावर प्रेम असतं तेव्हा तुम्ही ते तोडत नाही तर त्याची निगा राखता.’ आपली ही भावना आपण सदैव स्मरणात ठेवायची. आणि म्हणूनच प्रेमाचं नाणं वाजवावं लागत नाही. ते वाजतंच! आणि ते वाजलेलं जगाला कळत नाही, पण ज्याला ऐकू यायचं त्याला ऐकू येतंच, अगदी भगवंतासारखंच. आवड म्हणजे प्रेम की प्रेम म्हणजेच आवड.? मग ते काहीही असो. निस्वार्थी मनाने केलेली प्रत्येक गोष्ट अमर असते. ते बंध कायमचे असतात. नेहमी आपल्याला पुढे नेतात, कधीच मागे खेचत नाहीत.!
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..