वचन

कधी कधी ना मी इतका निराश होतो की, काहीच कळत नाही. वाटतं की, बस्सं झालं आता, एकदाचं मोकळं होऊयात वाटतं या सा-यातून. तेव्हा नको नको ते विचार मनात येऊन जातात, तेव्हा आपलं बोलणं जेव्हा नुकतंच सुरू झालं ना, तेव्हा मी तुला दिलेली वचनं मला आठवतात, आणि मग कुठं मन शांत होतं, तेव्हा वाटतं की, निदान आपल्या माणसांसाठी, जो आपल्याला आपलं मानतो त्याच्यासाठी, त्याला दिलेल्या वचनासाठी तरी आपण जगलचं पाहिजे...

खूपदा जगण्याला माझ्या
मी खूप कंटाळतो..
मग तुझी आठवण येता
मरण्याचा विषय टाळतो..!🎭

माझी थोडीशी लिहायची हौस, आणि दररोज श्रावणसरीं सारखा तुझ्या आठवणींचा पाऊस.! हळूहळू हेच जीवन बनत चाललयं.

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ
#त्याच्या_मनातलं
#वचन
#गंध_आठवणींचा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..