पाऊस
पाऊस
नुसता पाऊस
सगळीकडं पाऊस
पडलेला पाऊस
पडणारा पाऊस
पडतोय पाऊस
पडणार पाऊस
चिखलातला पाऊस
झाडातला पाऊस
पानातला पाऊस
फुलातला पाऊस
खोडातला पाऊस
बुंध्यातला पाऊस
मुळातला पाऊस
मातीतला पाऊस..!
पाऊस..
नुसता पाऊस..
पाऊसातला पाऊस
पाण्यातला पाऊस
चिखलातला पाऊस
डबक्यातला पाऊस
नदीतला पाऊस
नाल्यातला पाऊस
ओंजळीतला पाऊस
ओघळणारा पाऊस
भिजणारा पाऊस
भिजवणारा पाऊस
ओला चिंब पाऊस..!!
पाऊस..
नुसता पाऊस..
घरातला पाऊस
छपरावरचा पाऊस
कौलातला पाऊस
पत्र्यातला पाऊस
गळका पाऊस
ओलसर पाऊस
निसरडा पाऊस
खळखळून वाहणाऱ्या
पाण्यातला पाऊस
हवेतला पाऊस
मनातला पाऊस
आठवणीतला पाऊस..!
पाऊस..
नुसता पाऊस..
शेतातला पाऊस
बांधावरचा पाऊस
पाटातला पाऊस
पीकातला पाऊस
चिवचिवणारा पाऊस
चोचीतला पाऊस
चोच पाऊस
ऊडणारा पाऊस
थव्यातला पाऊस
पंखातला पाऊस
पंख पाऊस..!!
पाऊस..
नुसता पाऊस..
डोळ्यातला पाऊस
झाडाला लटकलेला पाऊस
सुन्या कपाळावरचा पाऊस
अनाथ पाऊस
उघडा पाऊस
दुथडी भरून
वाहणारा पाऊस
कोरडाठक्क पाऊस
राजकीय पाऊस
जातीय पाऊस
रंगांचा पाऊस
रंग पाऊस
बेरंग पाऊस
पाऊस
नुसता पाऊस..!!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ