०५ जुलै, २०२३

तुम्ही भोगलेलं शेवटपर्यंत ऐकताना डोळ्यात पाणी आणि हुंदका दाटून आला होता राव.! 
खूप वाईट आहे हे सारं.. 
"बाईची ती वेदना, आणि पुरूषाचं ते रडगाणं" हाच न्याय आहे आजकालच्या समाजाचा.
तुम्हाला ऐकत असताना कुठंतरी मी माझ्या एका मित्राला तुमच्यात पाहत होतो. तुमच्या इतके वाईट अनुभव नाही आले त्याला, पण गेली तीन वर्षे कोर्टकचेरी करतोच आहे. साधासुधा किरकोळ मेडिकल problem आहे त्याच्या बायकोचा, तो लपवून ठेवून त्याचं तिच्याशी लग्न केलं. संपूर्ण खर्च घालून तो तिला बरी करतो असं म्हणत असताना, ती व तिच्या माहेरचे तयार नाहीत. तिच्या त्या problem मुळे ती आधीपासूनच खूपच अशक्त आहे, पटपट कामही होत नाहीत. तिचा सदरचा problem त्याला लग्नाच्या दोन वर्षांनंतर समजला, तरीही तो तिला व तिच्या माहेरच्यांना समजून घेऊन, ते सांगतील ते औषधोपचार करत होता, पण काहीच फरक पडत नसल्याने त्याने शस्त्रक्रियेचा हट्ट धरला असता, ती माहेरी जाऊन राहिली आहे आणि त्याच्यावर, त्याच्या संपूर्ण कुटुंबावर आणि लग्नातल्या मध्यस्थांवर कौटुंबिक हिंसाचाराचा फौजदारी खटला दाखल केलाय. कोर्टाने कित्येकदा समुपदेशन करूनही ती नांदायला येत नाहीये. आता गेल्या वर्षभरापासून त्याने सुद्धा शस्त्रक्रियेचा हट्ट सोडलाय, जशी आहेस तशी ये, तुझं जेवढं आयुष्य असेल तेवढं जग, असं सांगूनही नांदायला तयार नाहीये. घटस्फोट मागितला असता, घटस्फोट ही देत नाहीये. नांदायला यायला सुध्दा पन्नास हजार द्या, एक लाख द्या, असे पैसे मागते आहे. ते घेऊन ही तिला ठीक वाटलं तर सासरी राहणार, नाहीतर पुन्हा माहेरी निघून जाणार असं बोलते आहे. महिन्याकाठी दोन तीन तारखा असतात. त्यात अंतरीम पोटगी ही तिला सुरूच आहे. तो एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील. खूप ओढाताण होते. गल्लीत सगळ्यांच्या सहानुभूती पुर्ण नजरा त्याला खूप बोचतात हो. कामाच्या ठिकाणी ही कळत नकळत सतत याच विषयाला हात घालून त्याची थट्टामस्करी केली जाते. सगळं हसून सोडून द्यावं लागतं, पण एकांत खूप छळतो, जाळतो. कित्ती कित्ती आणि काय काय आठवून जातं. किती साधी सोपी स्वप्नं उराशी बाळगून त्यानं लग्न केलं होतं, पण सगळं व्यर्थ. कोर्टात सुध्दा खटल्यांचा अक्षरशः ढीग लागलाय. न्यायाधीश प्रत्येक वेळी फक्त तारखा देऊन मोकळे होतात. कधी कधी तो सुद्धा मरण्या मारण्याच्या गोष्टी करीत असतो, पण आम्ही मित्र लोक त्याला कायमच या नैराश्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो, पण लग्नाआधीचा तो, आता वाटत नाही. चेहऱ्यावर तर काही दिसत नाही, पण त्याच्या मनातली वादळं ही फक्त त्याची त्यालाच ठाऊक.
वकील साहेबांची फी आणि तिची पोटगी भरण्यात वर्षे निघून जात आहेत, पण अजूनही हाती काहीच लागत नाहीये. फक्त तारीख पे तारीख... तारीख पे तारीख..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..